◾धवल मार्टचे मालक वीरधवल घाग यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय समाज सेवा केंद्रातील बालकांसाठी वस्तू वाटप..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२४ :- प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक व धवल मार्टचे मालक वीरधवल घाग यांच्या वाढदिवसानिमित्त धवल मार्ट व युवक काँग्रेसतर्फे भारतीय समाजसेवा केंद्रातील अनाथ बालकांसाठी उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूळचे नायशी गावातील रहिवासी व प्रथितयश बांधकाम व्यवसायिक धवल मार्टचे मालक वीरधवल घाग यांच्या वाढदिवसानिमित शनिवारी भारतीय समाज सेवा केंद्रातील अनाथ बालकांसाठी उपयोगी खेळणी, खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तू आदी वस्तू भेट स्वरूपात देऊन आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी वीरधवल घाग यांच्या कन्या व युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, विशाल पालकर व भारतीय समाजसेवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

