◾आमदार दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोविड पायाभूत सुविधां बाबत केले नियोजन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२४ :- कोविड काळात राजकारण आणि आरोप थांबले पाहिजे सर्वांनीच जनता जनार्दनांची काळजी घेतली पाहिजे असे आमदार दिपक केसरकर यांनी सांगून सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले मतदारसंघासाठी ५० ऑक्सिजन काॅन्स्टेटर खरेदी केले जातील. त्याचा चांगला उपयोग होईल असे केसरकर म्हणाले.
आमदार केसरकर म्हणाले, गेले तीन दिवस मी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सावंतवाडी मतदारसंघात कोविड नियोजनाचा मास्टर प्लॅन मॉडेल तयार केले आहे. अजूनही काही सूचना, सरपंच यांच्या मागण्या असतील त्याला प्राधान्य दिले जाईल यानंतर हा प्लॅन निश्चित कुडाळ आणि कणकवली मतदार संघात देखील राबविला जाईल. लसीकरण मध्ये गर्दी टाळता येईल यासाठी विचार केला जात आहे तीनही तालुक्यातील शहरांमध्ये लसीकरण गर्दी टाळून विकेंद्रीकरणला प्राधान्य दिले जाईल. एकावेळी दोन ठिकाणी लसीकरण करता येईल का आणि प्रभाग निहाय किंवा गाव निहाय लसीकरण करता येईल का याबाबत देखील अधिकाऱ्यांना योजना आणण्यास सांगितले आहे.
आमदार केसरकर म्हणाले, सावंतवाडी विधानसभा मतदार संघात लसीकरण तक्ता तयार केला जाईल तसेच एसटी बस निर्जंतुकीकरण करून लसीकरणासाठी वापराव्या याबाबत देखील नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय, उपकेंद्रावर लोकांना जाण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी असे नियोजन करण्यात आले आहे. ॲम्बुलन्स आमदार निधीतून दहा दिल्या जातील.
सावंतवाडीत कार्डिऍक मशीन उपलब्ध करून दिली जाईल ती वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्याला वापरता येईल अमेरिकन एक औषध जंतुनाशक फवारणी केल्यानंतर किमान एक महिना कोविड पासून बचाव होऊ शकतो असे औषध आहे ते प्रथम शहरे आणि सरकारी कार्यालयात फवारणी करावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे असे आमदार केसरकर म्हणाले .
गरम पाणी आणि वाफ घेण्यासाठी काही यंत्रणा उपलब्ध करून दिली जात आहे. गृह अलगीकरण असणार्याना ऑक्सीमीटर, थर्मल गन दिली जाईल.कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन देखील ग्रामीण रुग्णालय किंवा कोवीड केअर सेंटर मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश दिले आहेत असे ते म्हणाले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई कीट, दर्जेदार मास्क दिले जावेत यासाठी निधी दिला जात असून आशा वर्कर्स घरोघरी जात आहेत त्यांच्या संरक्षणासाठी पीपीई कीट उपलब्ध करून दिले जाईल. रिक्षा, एसटी, आरोग्य आणि सरकारी कार्यालयात अमेरिकन औषध जंतुनाशक फवारणी करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. सरपंचांना ५० लाखांचा विमा उपलब्ध करून दिला जावा म्हणून ग्रामविकास मंत्री यांची आपण चर्चा करणार आहोत असे ते म्हणाले कारीवडे येथील अनंत पॅलेस हॉटेल मध्ये डॉ. अजय स्वार व मित्र मंडळने समर्पित कोवीड सेंटर सुरू केले आहे त्याचे उद्घाटन उद्या रविवारी ११ वाजता होणार आहे असे ते म्हणाले
सावंतवाडी मतदारसंघात कोविड मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. व्यापारी वर्गाला जीएसटी सवलत मिळावी, विजेच्या बिलात सवलत मिळावी अशी मागणी आहे
कोवीडसाठी प्रथम २ कोटी ३५ लाख रुपये पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत. कोरोना मुक्त जिल्हा होण्यासाठी जे जे करता येईल ते ते केले जाईल जिल्ह्यातील जनतेला कोरोना मुक्त करून चांगलं आरोग्य मिळावे म्हणून कर्तव्य भावनेने हे मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे असेही केसरकर म्हणाले.

