आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

कणकवली शहरातील दाखल करायच्या रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था – नगराध्यक्ष समीर नलावडे

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २४ बऱ्याच वेळा रुग्णवाहिकेअभावी कोविड रुग्णांची परवड होत असल्याचं चित्र दिसून येत. हीच गरज ओळखून नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय. कोविड केअर सेंटर पासून कणकवली शहरातील दाखल करायच्या रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामार्फत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिलीय.

कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालय किंवा शिरवल, हरकूळ बु. येथील कोविड सेंटरमधून कणकवली येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी खासगी रुग्णवाहिकेकडून सुमारे दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी केली जाते. तसेच कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्याकरिता रुग्णवाहिकेचे वारेमाप भाडे घेतले जाते. कोविडमुळे अनेकांच्या हाताची रोजीरोटी गेलेली असतानाच, त्यात करून अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिकेचे भाडे भरणे रूग्ण किंवा मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, शिरवल व हरकुळ बुद्रुक येथील कोविड केअर सेंटर या ठिकाणी कणकवली शहरातील दाखल करायच्या रुग्णांना घरापासून ते कोविड सेंटरपर्यंत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यामार्फत मोफत रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या तीनही ठिकाणी जर या आजारामुळे कणकवली शहरातील रुग्णाचे निधन झाले तर, त्या रुग्णाला त्या ठिकाणाहून कणकवली स्मशानभूमी पर्यंत रुग्णवाहिकेत द्वारे मोफत आणण्याची व्यवस्था देखील नगराध्यक्ष नलावडे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कणकवली शहरातील कोविड पॉझिटीव्ह आल्यानंतर ज्या रुग्णांना कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी जायचे असेल किंवा शहरातील कोविड ने मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी याबाबत थेट आपल्याशी 9420206464 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे. गेले चार दिवस नगराध्यक्ष नलावडे यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, बाळा वळंजू मित्रमंडळची रुग्णवाहिका यासाठी उपलब्ध करून ठेवण्यात आली असल्याचे नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहरातील कोविडच्या सर्वच रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे नलावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!