◾संकटकाळी धर्याने तोंड देणे गरजेचे आमदार शेखर निकम
◾चिपळूणवासीयांना आधार देताना घेतला उपाययोजनांचा आढावा..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२३ :- आमदार शेखर निकम यांनी आज शुक्रवार २३ एप्रिल रोजी प्रांत कार्यालयात कोविड १९ संदर्भात शहरातील व ग्रामीण भागातील परिस्थिती व तेथील उपाययोजना प्रशासनाशी चर्चा करून समजावून घेतल्या व अडचणी व धर्याने सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने मार्ग काढणाच्या सूचना केल्या.यावेळी प्रांताधिकारी प्रविण पवार ,तहसीलदार जयराज सूर्यवंशी ,पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, चिपळूण नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव विधाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ ज्योती यादव, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ आदी उपस्थित होते
यावेळी शहरात कोविड सेंटर काढण्यासंदर्भात नामवंत डॉ यतीन जाधव व अपरांत हॉस्पिटल यांना जागा उपलब्ध करून देणे,ग्रामीण भागातील वाढत्या कोविड संदर्भात काय केले पाहिजे कुठल्या अडचणी येत आहेत याबाबत उपाययोजना,तालुक्यात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे,मौजे कालुसते मदरसा येथे DCHC येथे कोविड सेंटर करण्या बाबत तिथल्या प्रमुख लोकांशी चर्चा,तसेच वैद्यकीय कर्मचारी याना येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करून करावयाच्या उपाययोजना याबाबत निश्चिती करण्यात आली.

