◾गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी ; लक्षणे आढळल्यास रँपिड टेस्ट..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-२२ :- महाराष्ट्राचे प्रवेशद्वार असलेल्या बांदा सटमटवाडी येथे गोव्यातून महाराष्ट्रात येत असलेल्या वाहनचालकांची तपासणी सुरू केली आहे.
बुधवारी सकाळ पासून सदरची तपासणी सुरू झाली असून रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू राहणार आहे. यामध्ये थर्मल गन च्या सहाय्याने तापमान मोजणे, आँक्सिजन लेवल चेक करणे तसेच काही लक्षणे आढळले असल्यास रँपिड टेस्ट करण्यात येईल.
सध्या सकाळपासून याठिकाणी सर्व वाहनचालकांची विचारपूस करून तापमान, आँक्सिजन लेव्हल तपासली जात आहे. सिंधुदुर्ग मधील अनेक युवक शेजारच्या गोवा राज्यात कामानिमित्त रोज जा ये करत आहेत. त्यांना रोज तापमान, आँक्सिजन लेव्हल चेक करूनच महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार आहे व पंधरा दिवसानंतर रँपिड टेस्ट त्यांची घेण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्यात लाँकडाऊन सूरू आहे. याच पार्श्वभूमीवर गोव्यातून येणाऱ्या वाहनचालकांना तपासणी करण्यात येणार आहे. बांदा पोलीस तसेच होमगार्ड हे याठिकाणी तैनात करण्यात आले आहे.

