◾मोरे येथील स्त्रीची भूमिका करणारे शंकर मोर्ये यांचे निधन..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴कुडाळ,दि-२२:- येथील मोरे गावचे मोरेश्वर दशावतार कंपनीचे मालक व स्त्री भूमिका साकारणारे शंकर मोर्ये (वय ५२) यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुडाळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. दशावतार मधील उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारणारे सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट दशावतार म्हणून ख्याती असलेले नामवंत कलाकार होते.त्यांच्यावर ओरोस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता तसेच ते सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात वडील, बायको, विवाहित तीन मुलगे,दोन मुली, सुना, पुतणे, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

