आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

◾जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लान्ट दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरू होणार..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२२ :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून ऑक्सिजन निर्मित प्रकल्प जिल्हा रुग्णालयात सुरू करण्याबाबत चर्चा सुरू होती . कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनसाठी धावाधाव करावी लागली नाही . मात्र , दुसऱ्या टप्प्यातील वाढत्या रुग्णांमुळे ऑक्सिजनसाठी धावपळ वाढली आहे . या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे सहा प्रकल्प उभारले जाणार आहेत . यातील रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील प्रकल्प पूर्ण होत आला आहे . त्याची प्राथमिक स्वरुपात चाचणी आज गुरुवारपासून सुरू करण्यात येणार असून दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे . जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात प्रसूती कक्ष व आय हॉस्पिटलच्या मधील जागेत हा प्रकल्प उभा राहात आहेत . ॲबस्टीम एअर रिसिवेर या कंपनीकडून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे .

जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयाप्रमाणेच आणखी पाच ऑक्सिजन प्रकल्प जिल्ह्यात मंजूर झाले आहेत . त्यामध्ये कामथे उपजिल्हा रुग्णालय , कळंबणी उपजिल्हा रुग्णालय , राजापूर उपजिल्हा रुग्णालय , दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लान्ट उभे करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . संघमित्रा फुले यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!