आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾प्रियांका मिरगावकर यांचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद ; आमदार शेखर निकम

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२० :- शहरातील बहादूरशेख नाका येथे प्रियांका अमित मिरगावकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किटस वाटप करून राबविलेला सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याची प्रशंसा आमदार शेखर निकम यांनी केली आहे.मिरगावकर करत असलेल्या या कार्याची माहिती मिळताच आमदार निकम यांनी त्याठिकाणी भेट दिली असताना बोलत होते.यासारख्या उपक्रमांना आपला नेहमीच पाठींबा राहील असेदेखील सांगितले.

शहरातील रॉक फिटनेस जिम व द पार्ट पार्टी हाऊस या प्रसिद्ध फार्म हाऊसच्या संचालिका प्रियांका मिरगावकर ह्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन मध्ये गोरगरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचीत राहू नयेत यासाठी त्यांनी २०० किटस वाटपाचे आयोजन केले होते.सदरचे वाटप रविवार १८ एप्रिल पासून रॉक फिटनेस जिम समोर,वांगडे मोहल्ला शेजारी,बहादूरशेखनाका याठिकाणी तीन-चार दिवस करण्यात आले होते.पहिल्या दिवशी त्यांनी ६० किट्स,दुसऱ्या दिवशी १९० वाटप असे एकूण २५० किट्स वाटप केले.याबद्दल शहरातील लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!