◾खेर्डी येथील थ्री एम पेपर मिल मधील कचरा डेपो प्रकरणाची चौकशी व्हावी..
◾युवक काँग्रेसची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-१९ :- खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपरमीलमधील कचरा डेपो आग प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन येथील तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांच्याकडे दिले.
यानुसार खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये थ्री एम पेपर मिल कार्यरत असून या कंपनीच्या आवारातील कचरा डेपोला रविवारी दुपारी अचानकपणे आग लागली. या आगीने इतके रौद्ररूप धारण केले होते की, ही आग तासनतास भडकतच होती. ही आग नियंत्रणात येत नव्हती. या वरून या कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात वेस्टेज मटेरियल होते, असे स्पष्ट होत आहे. तसेच या आगीच्या धुराचे लोट परिसरातील गावागावातून दिसत होते. ही आग तासनतास सुरूच होती. तरीही कंपनी बंद करण्यात आली नव्हती. यावरून कंपनी व्यवस्थापनाला कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी नाही, असे देखील घटनेवळी दिसून आले.-एकंदरीत कंपनी व्यवस्थापन बेफिकीर आहे, असेच म्हणावे लागेल. यापूर्वीदेखील या कंपनीच्या कचरा डेपोला आग लागण्याची घटना घडली होती. मागील घटनेचा बोध घेऊन भविष्यात आग लागू नये, या दृष्टीने कंपनीने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे रविवारी लागलेल्या आगीवरून स्पष्ट होत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी होऊन कंपनीविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, शहराध्यक्ष फैसल पिलपिले उपस्थित होते.