आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुलिच्या पथकाने केली गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात जम्बो कारवाई..

 

◾५० लाख ४२ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त ; कारवाईत दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१८-: गोवा राज्यातून मुबंईच्या दिशेन बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारू वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुलिच्या पथकाने केलेल्या जम्बो कारवाईत दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत दारूसाठ्यासह एकूण ५० लाख ४२ हजार इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चालकाला अटक करण्यात आली असून त्यावर दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात संचार बंदी सुरू असताना चोरट्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतूकिवर लक्ष ठेवून असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभाग इन्सुलि यांना टेम्पो मधून दारू वाहतूक केली जाणार असल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यापार्श्वभूमीवर सापळा रचण्यात आला होता. मळगाव येथे झाराप पत्रादेवी मार्गाजवळ मुबंईच्या दिशेने जात असलेला टेम्पो (जी जे ०१ डी वाय ७७११) शनिवारी रात्री १२.३० च्या सुमारास तपासणी साठी थांबविण्यात आला. यावेळी तपासणी केली असता ४८० बॉक्स आढळून आले.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक सिंधुदुर्ग डॉ.बी.एच तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एच. चव्हाण, दुय्यम निरीक्षक ऐ.ऐ.पाडळकर, कर्मचारी रमेश चंदूरे, शरद साळुंखे, संदीप कदम, एच.आर. वस्त यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक एस.एच. चव्हाण करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!