◾थ्री एम पेपर मिल कंपनीत लागली आग ; नागरिकांत घबराट..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१८ :- नजीकच्या खेर्डी एम आय डी सी मध्ये असणारी थ्री एम पेपर मिल या कागदाच्या कंपनीत आग लागल्याच्या ज्वाला दिसत असल्याने नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.अधिक माहिती घेतली असता कंपनीतील टाकाऊ मालाला आग लागली असल्याचे समजते.दरम्यान आग विजवण्यासाठी घटना स्थळी अग्निशामक दाखल झालेले आहेत. कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी नाही. आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न यंत्रणेकडून केला जात आहे.
सदरची कंपनी खेर्डी गावच्या नागरी वस्तीपासून जवळ असल्याने आग लागल्यामुळे नागरिकांतून घबराट व्यक्त केली जात आहे.उष्णतेचे तापमान सध्या जास्त असल्यामुळे असल्या घटनांनी धोका निर्माण हाऊ शकतो.या कंपनीतून अनेकदा सांडपाणी नदीत सोडल्यामुळे देखील तक्रारी निर्माण झालेल्या आहेत.तरी व्यवस्थापनाकडून नागरिकांचे आरोग्य तसेच जीवनमान धोक्यात येणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

