◾दोडामार्ग मध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड ॲक्शन सुरू..
◾पन्नास जणांची करण्यात आली तपासणी ; रॅपिड टेस्ट मध्ये एक जण सापडला कोरोना पॉझिटिव्ह..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-१८ :- दोडामार्ग शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. ही रॅपिड टेस्ट दोडामार्ग तालुका आरोग्य विभाग, नगर पंचायत दोडामार्ग व महसूल विभाग यांच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाने वारंवार सुचना देऊन सुध्दा नागरीक त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अचानक केलेल्या रॅपिड टेस्ट मुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांना याचा चांगलाच दणका बसला. रॅपिड टेस्ट दरम्यान एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. प्रशासना कडून सावधानतेच्या सुचना दिल्या जात आहेत.