आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾वेतोरे येथे सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती यांच्या वतीने राबविण्यात आला संस्था आपल्या दारी उपक्रम..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि-१६ :- संस्था आपल्या दारी हा नवीन उपक्रम सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे राबविण्यात आला .वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावची कन्या पूजा रूपाजी धुरी हिने जी डी आर्ट पेंटिंग या विभागातून प्रथम श्रेणी ६० % गुण मिळवून विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. कुमारी पूजा हिने सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात नॉर्मल मुलांमधून पाच वर्षे उच्चशिक्षण घेऊन हे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती या संस्थेच्या वतीने अध्यक्ष अनिल शिंगाडे व शिष्टमंडळाने दिव्यांग बांधवांचे उपस्थितीत पूजा धुरी हिचा सत्कार करण्यात आला .सिंधुदुर्ग अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेच्या वतीने पूजा धूरी हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!