◾बांदा नट वाचनालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा,दि-१५ :- बांदा नट वाचनालयच्या वतीने भारत रत्न महामानव , भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नट्ट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत व उपाध्यक्ष सुभाष माेर्ये यानी बाबासाहेबांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले . यावेळी या कार्यक्रमास सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेंमत माेर्ये, जगन्नाथ साताेसकर, शंकर नार्वेकर, अंकुश मांजगावकर, रामदास जाधव,महेश सावंत, ग्रंथपाल प्रमिला माेरजकर/नाईक, अमिता परब, सुनिल नातु उपस्थित हाेते. सुभाष माेर्ये , एस आर सावंत, रामदास जाधव यानी डाँ. बाबासाहेबां बद्दल आपले विचार व्यक्त केले. बाबासाहेबांच कार्य व विचाराने आपल्या देशाला एक वेगळी दिशा मिळाली. ते खराेखरच महामानव हाेते. तसेच सावंत आपले विचार व्यक्त करताना बाबासाहेबानी आपल्या भारत देशाचे संविधान बनविताना समाजातील सर्व घटकांचा विचार करुन बनविले. त्याचे विचार आपल्या देशाला नेहमी प्रेरणा देत आहेत असे विचार मांडण्यात आले. सुत्रसंचालन व आभार राकेश केसरकर यांनी केले.

