◾दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन नाडण येथील दाम्पत्य जागीच ठार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴देवगड,दि-१५ :- दुचाकी व टेम्पो यांच्यात भीषण अपघात होऊन नाडण येथील दाम्पत्य जागीच ठार झाले. संजय दत्तात्रय जोशी वय ५० व सायली संजय जोशी वैसे ४७ हे दांपत्य जागीच ठार झाले
हा अपघात आज संध्याकाळच्या सुमारास विजयदुर्ग देवगड महामार्गावर वाडा कडेवाडी येथे घडलादुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग-देवगड सागरी महामार्गावर वाडा सडेवाडी येथे घडला.
ते दोघेही देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस घेण्यासाठी जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच ठार झाले. याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संजय दातीवली, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, कर्मचारी फक्रुद्दीन आगा, गणेश चव्हाण आदींनी त्याठिकाणी धाव घेत मदत कार्य केले. याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

