आणखीकोकणक्राइममहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ओटवणेत थरारक पाठलाग करुन केला दारुसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त..

 

◾सिंधुदुर्ग एक्साइज भरारी पथकाची कारवाई..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस

🎴बांदा,दि-१४ :- गोव्यातून ओटवणेमार्गे गोवा बनावटीची दारु वाहतुक करणार्‍या कारचा थरारक पाठलाग करुन उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ३ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पावसामुळे निसरडा रस्ता झाल्याने कारचा अपघात झाला व संशयित आयताच एक्साइजच्या जाळ्यात सापडला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी तारेंद्र राजाराम पार्सेकर (रा. बार्देश गोवा) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार (एमएच ०८ झेड ००२४) ताब्यात घेण्यात आली. बांदा – दाणोली मार्गावर ओटवणे तिठा येथे मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा – दाणोली मार्गावर सिंधुदुर्ग भरारी पथकाकडून ओटवणे तिठ्यावर गाड्यांची तपासणी सुरु होती. गोव्यातून रत्नागिरीकडे ओटवणे मार्गाने जाणार्‍या कारला तपासणीसाठी थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र चालकाने तशीच वेगाने कार पुढे नेली. अधिकार्‍यांना संशय आल्याने कारचा पाठलाग करण्यात आला. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने कार ओटवणे य़ेथे घसरुन रस्त्याबाहेर गेल्याने संशयित आयताच जाळ्यात सापडला.

कारमध्ये तब्बल ४५ गोवा बनावटीच्या दारुचे बॉक्स होते. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत २ लाख ३५ हजार ९२० रुपये आहे. तसेच दीड लाख रुपयांची कार असा एकूण ३ लाख ८५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग भरारी पथकाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, जवान डी. आर. वायदंडे, आर. एस. शिंदे यांच्या पथकाने केली. अधिक तपास डी. एम. वायदंडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!