आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सभापती निकिता सावंत यांचा डेगवे आंबेखणवाडी ग्रामस्थांतर्फे करण्यात आला सत्कार..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा,दि-१४ :- गुढीपाडव्याचे औचित्य साधून सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती निकिता सावंत यांचा डेगवे -आंबेखणवाडीच्या ग्रामस्थातर्फे डेगवे गावचे जेष्ठ ग्रामस्थ, सैनिक व माजी सरपंच नागबा देसाई यांच्या हस्ते ‘श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र’ येथे सत्कार करण्यात आला.

सर्व प्रथम डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास देसाई यांनी त्यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले.

उल्हास देसाई यांनी गुढीपाडव्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ व सभापती यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून ‘श्री ब्राह्मणी स्थळां’ च्या जिर्णोद्धाराची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

या वेळी ग्रामपंचायतीच्या सदस्या वैशाली देसाई, राजश्री देसाई, शामल देसाई, निलीमा परब, वामन देसाई, शामसुंदर देसाई, लक्ष्मण देसाई,विनय देसाई,योगेश मांजरेकर,चंद्रकांत देसाई,मोहन देसाई,डेगवे सोसायटीचे माजी चेअरमन सुर्याजी देसाई,अत्माराम देसाई,महादेव परब. सदानंद देसाई ,प्रकाश देसाई आंबेखण ग्रामस्थ आर्वजून उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच मंगलदास देसाई तर आभार योगेश मांजरेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!