आणखीकोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात आज साधेपणाने रंगपंचमी साजरी करून शिमगोत्सवाची करण्यात आली सांगता..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा,दि-११ :- विकेंड लॉकडाऊन असल्याने बांदा शहरात आज साधेपणाने रंगपंचमी साजरी करून शिमगोत्सवाची सांगता करण्यात आली. नेहमीप्रमाणे डीजे व ढोलताशाना फाटा देत तरुणाईने रंगोत्सव साजरा केला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बांदा शहरात पंधरा दिवस शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी कोरोनाचा सामूहिक संसर्ग वाढल्याचे राज्य शासनाने राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जाहीरपणे रंगपंचमी साजरी करण्यावर मर्यादा आल्या. दरवर्षी धार्मिक पद्धतीने मांडावर रंगांची उधळण केल्यानंतर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात येते.

यावर्षी लॉकडाऊन नियमावली असल्याने मर्यादित स्वरूपात रंगपंचमी साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी युवा वर्गाने रंगांची उधळण करत रंगोत्सव साजरा केला. शहरातील बहुसंख्य कुटुंबियांनी कोरोना नियम पाळत घरातच रंगपंचमी साजरी केली. विकेंड लॉकडाऊन असल्याने शहरात तुरळक वाहनांची वर्दळ होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!