आणखीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

सिंधुदुर्गनगरी पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तीन पत्ती जुगाराची मोठी उलाढाल

◼️परमपूज्य राणे महाराज यांच्या मठा शेजारी रात्रीस खेळ चाले – पोलीस मुग गिळून गप्प…

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग (ओरोस) : दि. ०९ सिंधुदुर्गनगरी पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परम पूज्य राणे महाराज यांच्या मठाच्या बाजूला‌ राजरोसपणे तीन पत्ती जुगार चालत असून, या ठिकाणी जिल्ह्याबाहेरील जुगारी मोठ्या प्रमाणात येत असल्याने लाखोंची उलाढाल होत आहे.

याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती असूनही ते मूग गिळून गप्प असल्याचे बोलले जात आहे, सदरचा तीन पाणी जुगार गेले. अनेक महिने सूर्य सुरू असून अवैध धंदा विरुद्ध कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनलने आपल्या संपादकीय सदरातून आवाज उठविल्यानंतर अनेकांनी याबाबत आमच्या कोकण लाईव्ह कडे तक्रार केली होती, मात्र कोरोना काळात सुद्धा हा जुगार अड्डा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या ठिकाणी एका रात्रीत लाखोंची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते.

या जुगार अड्ड्याचे १५ चालक असून त्यांचा वाटा ठरलेला आहे, तसेच बाहेरील भागवा – भगवी करण्यासाठी दरवेळी काही विशिष्ट रक्कम बाजूला ठेवली जाते. याच अर्थ कारणातून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. शिवाय यातील एक भागिदार दात पडक्या आप्पा यांनी आपले कोणीच काही वाकडे करू शकत नाही? कोणाची हिंमत असेल तर आपला जुगार बंद करून दाखवा? अशी दर्पोक्ती केल्याने परिसरातील नागरिक हा जुगार बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोणा – कोणाला किती – किती रक्कम दिली जाते, त्याचा हिशोबही तक्रारदाराने कोकण लाईव्ह कडे दिला आहे. त्यामुळे त्याचाही लवकरच पर्दाफाश होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!