आणखीकणकवलीकोकणक्राइमसिंधुदुर्ग

शिवसेना कार्यकर्ता रिमेश अशोक चव्हाण, याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०८  पोलीस हवालदार झुजे फर्नांडिस यांच्याशी हुज्जत घालून धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना कार्यकर्ता रिमेश अशोक चव्हाण, वय ३१, रा. कलमठ याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली असून त्याला न्यायालयात हजार करणार आहेत. ही घटना कणकवली पोलीस पेट्रोल पंपानजीक बुधवारी रात्री ९.३० वा. सुमारास घडली.

रीमेश चव्हाण यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या डंपर चालका सोबत वाद घालत शिवीगाळ करत असताना मोठं मोठ्याने भांडणाचा आवाज आल्याने हवालदार झुजे फर्नांडिस यांनी घटनास्थळी जाऊन विचारणा केली असता रिमेश याने त्यांच्याशी हुज्जत घालत पोलिसांना मारहाण करून धमकी दिली.

झुजे यांच्या फिर्यादीनुसार रिमेश याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.दं.वि. कलम 353, व शिवीगाळ करण्यापरकरणी 504,506, आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी १८८ प्रमाणे , कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!