महाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

◾चिपळूण पंचायत समिती उपसभापतीपदी प्रतापराव शिंदे यांची निवड..

 

🖥️ Kokan Live Braking News

 ✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण, दि- ०६ :- पंचायत समिती उपसभापतीपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेना चिपळूणचे तालुकाप्रमुख आणि पंचायत समिती सदस्य प्रतापराव शिंदे यांची निवड करण्यात येणार आहे.नुकतेच सभापती पदासाठी राष्ट्रवादीतर्फे सौ रिया कांबळे यांनी पदभार स्वीकारला असून उपसभापती पांडुरंग माळी यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे उपसभापतीपदासाठी शिवसेनेकडून प्रतापराव शिंदे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी ही निवड करण्यासाठीची कार्यवाही करण्याचे सांगितले आहे. रत्नागिरी संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उपजिल्हाप्रमुख शशिकात चाळके,शहरप्रमुख उमेश सकपाळ, तालुका संघटक राजू देवळेकर, चिपळूण तालुका सचिव दिलीप चव्हाण यांनी त्याचे स्वागत करून शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांना पंचायत समिती चिपळूण उपसभापतीपदाची उमेदवारी घोषित करण्यात आल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!