कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली कोरोनाची लस…
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 कणकवली : दि. ०६ कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील कोरोनाची लस घेतली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन त्यांनी ही लस घेतलीय. तसेच, प्रत्येक नागरिकान लस घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
कोरोना पासून बचाव व निबंधात्मक उपाय म्हणून कणकवलीतील ४५ वर्षा पुढील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे. कारण अजून कोरोना गेलेला नाही आणि कोरोनावर उपाय म्हणून जी लस उपलब्ध आहे. ती लस जनतेने घेण्याची गरज आहे असेही नलावडे म्हणाले.त्यांनीही आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय मध्ये जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.
शासनाच्या धोरणानुसार कणकवलीतील ४५ वर्षा पुढील सर्व जनतेने करोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी कोरोना लस घेण्याचे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. यावेळी सामजिक कार्यकर्ते राजू गवाणकर यांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

