आणखीकणकवलीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई सुरू…

◾कणकवली शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴 कणकवली : दि. ०६ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यामुळे काल पासून कडक निर्बंध लागले असून, त्या पाश्वभूमिवर आजचा कणकवली आठवडा बाजार बंदचे संबंंधित प्रशासनाने काल जाहिर केले होते. मात्र, आज सकाळ पासून बाजारपेठेत झालेली गर्दीमुळे पोलिसांनी इतरही दुकाने ( अत्यावश्यक सेवा वगळता ) बंद केली. त्यामुळे नियमित व्यवसायिकांची काहीशी तारांबळ उडाली.

दरम्यान, संबंंधित प्रशासनाने फक्त आठवडा बाजार बंदचे जाहिर केले होते. मात्र नियमित दुकाणांबाबत काही सुचना मिळाल्या नसल्याने आज सकाळी कणकवली बाजारपेठेतील दुकाने रोजच्या प्रमाणे खुली करण्यात आली होती. परंतु, गर्दी होण्यास सुरूवात झाल्याने कणकवली पोलीस डि.वाय.एस.पी नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजुरुद्दीन मुल्ला, उप निरीक्षक एस. एस. खंडागळे, किरण मेटे, वाहतूक पोलीस संदेश आबिटकर आदीनी ध्वनी प्रक्षेपाने बंदचे हाक देत जनजागृति करत कोरोनावर शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर यावेळी विना कारण तसेच मास्क शिवाय फ़िरणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!