◾सावंतवाडी तहसीलदार कार्यालयत एका कर्मचाऱ्यावर केली लाच लुचपत विभागाने लाच घेतल्या प्रकरणी कारवाई..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि- ०५ :- तहसीलदार कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर लाच घेतल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, लाच लुचपत विभागाकडून आज ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , तहसीलदार कार्यालयत काम करणारा लिपिक पुरूषोत्तम वारंग असे कारवाई झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ऐपतीचा दाखल देण्यासाठी त्याने चार हजाराची मागणी केली. त्याचवेळी लाच लुचपत विभागाने त्याला रंगेहाथ पकडले.
डीवायएसपी दीपक कांबळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस निरीक्षक नितेश केणी, पोलीस हवालदार रेवणकर, परब, पोलीस नाईक पालकर, महिला पोलीस प्रभू यांनी ही कारवाई केली.

