कोकणरत्नागिरीराजकीय

◾पोफळीचे सुपुत्र रत्नागिरी जिल्हा भाजप उपाध्यक्ष वामनराव पवार यांचे निधन..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-०५ :- गोरगरिबांचे कैवारी रत्नागिरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वामनराव पवार यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले त्यावेळी त्यांचे वय ७२ होते त्यांच्या निधनाने रत्नागिरी जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे

पोफळीचे सुपुत्र वामनराव पवार यांचे शालेय शिक्षण पोफळी येथे झाल्यानंतर कामानिमित्त त्याने मुबंई गाठली. त्याठिकाणी नोकरी करत ट्रान्सस्फोर्टचा छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांना राजकारणाची विलक्षण आवड असल्यामुळे सुरुवातीला राष्ट्रवादीचे कॉग्रेस पक्षाचे काम करू लागले. त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे पक्षाने त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली. आणि त्यानी प्रामाणिकपणे त्या पदाला न्याय देत पक्षाची संघटना वाढवली .

त्यांनी राजकारणाबरोबर आपल्या व्यवसायकडे सुद्धा लक्ष दिले. त्यामुळे वैशाली ट्रान्सकरियर ही संपूर्ण महाराष्ट्रात काही कालावधीत नावारूपाला आली. दरम्यानच्या काळात वामनराव पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर ते काम करू लागले. वामनराव पवार म्हणजे सर्वांचे भाऊ व्यवसायसाठी जरी मुबंईत होते तरी गावाकडची ओढ त्यांना शांत बसून देत नव्हती. त्यांनी पोफळी पवारवाडी येथील महाकाली मंदिराची देखणं वास्तू उभी केली. त्याचबरोबर दिवाळी मध्ये गोरगरिबांना तांदूळ,साखर,मैदा याचे वाटप करून दिवाळी भेट कार्यक्रम केला. त्याचबरोबर प्रथमच पोफळीला एक लाखाची दही हंडी कार्यक्रम सुद्धा केला होता महाकाली मंदिराच्या वर्धापन दिनाला नामवंत कलाकार यांना निमंत्रित करून दर्जेदार कार्यक्रम त्यांनी केले त्याचबरोबर स्थानिक कलाकार यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले

भाऊचे वय जरी झाले असले तरी तरुणांना लाजवेल असे काम करत असत त्याच्या अंगी जिद्द ध्येय चिकाटी पाहून तरुण पिढी त्याच जोशात काम करत असे त्याना त्यांचे चिरंजीव प्रशांत व शशांक यांनी मोलाची साथ दिली भाजपच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम करीत असताना भाऊनी पक्ष संघटना वाढवली त्याचबरोबर पक्षाच्या माध्यमातून तालुक्यात अनेक महत्वपूर्ण कार्यक्रम केले

वर्षभरापूर्वी भाऊंना ह्दयचा तीव्र झटका आला होता त्यातून ते बरे झाले आणि काही महिन्यातच त्यांनी पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली त्यामुळे सर्व कार्यकर्ते यांच्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते लॉकडाऊनच्या कालावधीत भाऊ पोफळी येथेच वास्तव्यास होते त्यावेळी शिरगाव पोलीस ठाण्यास त्यांनी ह भ प चंद्रराव पवार प्रतिष्ठानच्या वतीने ब्रेकेट्स भेट स्वरूपात दिले होते वारकरी संप्रदायात विशेष लक्ष देत असत तर महाकाली देवीच्या विविध कार्यक्रमात ते हिरिरीने सहभागी होत असत त्यांचे वडील ह भ प चंद्रराव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त नामवंत कीर्तनकार यांना निमंत्रित करत पोफळीत कार्यक्रम करीत असत तर ह भ प चंद्रराव पवार प्रतिष्ठान तर्फ रुग्णवाहिका घेऊन सर्वसामान्य यांची सेवा करीत असत. तर कोरोनाच्या परिस्थितीत अनेकांना त्यांनी मदत केली होती त्यानंतर भाऊंना पिताशयचा त्रास जाणवू लागला आणि मुबंईतील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली होती मात्र लगेच त्यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आणि याच दरम्यान ते कोमात गेले सुरुवातीला काही महिने मुबंई तर त्यानंतर पुणे येथील हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते त्यामुळे सोमवार दि ५ एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगी,मुलगी सून जावई व नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!