आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

पुन्हा भाजपच्या वाटेला गेल्यास सुशांत नाईक यांना जशास तसे उत्तर दिले जाईल – मिलिंद मेस्त्री

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ०३ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर आरोप करणाऱ्या नगरसेवक सुशांत नाईक यांनी पहिल्यांदा ठेकेदारी वरून शिवसेनेत सुरु असलेल्या गटबाजीवर लक्ष द्यावे. शिवसेनेत ठेकेदारांचा भरणा झाल्याने शिवसेनेत गटबाजीमुळे कणकवलीत ३ कार्यालये सुरू करण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. याच गटबाजीतून एका कार्यालयाचे नामकरण दलाल भवन असे करण्यात आले आहे. ज्यांचा पक्ष ठेकेदारी व दलालीवर चालतो, अशांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्याच्या फंदात पडू नये. असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांनी दिला आहे.

सुशांत नाईक यांचे भाऊ आमदार वैभव नाईक यांच्यावर खासदार विनायक राऊत व शिवसेनेच्या नेत्यांचा विश्वास नसल्यामुळेच वैभव नाईक यांना मंत्रीपद डावलून रत्नागिरीच्या आमदारांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री करण्यात आले. शिवसेनेची जिल्ह्यातील ही दुर्दैवी स्थिती आधी सुशांत नाईक यांनी अभ्यासावी. भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर आरोप करत असताना कणकवलीत अनधिकृत बांधकामाचे बादशहा ओळखले जाणाऱ्या सुशांत नाईक यांनी आपली बांधकामे संभाळून राजकारण करावे. शिवसेनेतील गटबाजी मुळेच आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस देखील दलाल भवन मध्ये न करता विजय भवन मध्ये साजरा केला गेला. त्यामुळे आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून पद्धत सुशांत नाईक यांनी बंद करावी. पतसंस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेवर निवडून येण्याचे स्वप्न भाजपा कार्यकर्ते हाणून पडतील. तर सुशांत नाईक यांचे जिल्हा बँक अध्यक्ष बनण्याचे मनसुबे शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते उधळून लावतील. पुन्हा भाजपच्या वाटेला गेल्यास सुशांत नाईक यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मिलिंद मेस्त्री यांनी दिला आहे.


▪️घरबसल्या कमवा दर दिवशी पाच हजार रुपये
Earn daily 500Rs. Free eraning/sarvy net job
*Send email to dnyneshwarpolji@gmail.com

to get details & sms to 8275134660 with address&name
——————————————————————-
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!