◾नगरपालिकेच्या सध्याच्या कारभाराची जनताच दखल घेऊन योग्यवेळी मत व्यक्त करेल ; माजी आम.रमेश कदम
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-०२:- ठेकेदारांकडून काही नगरसेवकांनी बैठक घेऊन पैसे मागितले या आरोपावर आपण ठाम आहोत . पालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेकेदारांबरोबर दोन बैठका घेऊन १५ टक्केची मागणी केली . त्या बैठका उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनीच बोलावल्या होत्या . त्यांची माझ्यावर बोलण्याची पात्रता तरी आहे का , असे सांगून माजी आमदार रमेशभाई कदम यांनी पत्रकार परिषदेत सुधीर शिंदे यांना जोरदार फटकारले . आतापर्यंत मला शिंगावर घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला . माझ्या अनेक चौकशा झाल्या . पण त्यात डोंगर पोखरून उंदीर निघाला . मी कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याने मला कलंक लागला नाही . उगाच माझ्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका , असा थेट इशारा श्री . कदम या वेळी दिला . चिपळूण पालिकेतील काही ठेकेदार माझ्याकडे आले आणि काही – नगरसेवकांनी बैठक घेऊन कामाच्या १५ टक्के इतकी पैशाची मागणी केली . पहिली छोट्या ठेकेदारांची बैठक झाली . नंतर मोठ्या ठेकेदारांची बैठक झाली . आशा दोन बैठका झाल्या . या बैठकांना उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे व सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते . ही गटनेत्यांची बैठक होती असे सांगितले जात आहे . मात्र शिवसेना व राष्ट्रवादीचे गटनेते हजर नव्हते.कामासंदर्भात जर बैठक होती तर या बैठकीला गटनेते का नाहीत . गट नेते आणि नगराध्यक्षांच्या अपरोक्ष कामे ठरवण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले ? असे अनेक प्रश्न श्री . कदम यांनी या वेळी उपस्थित करत ही बैठक सेटलमेंटसाठीच होती , असे ठामपणे सांगून नगरपालिकेच्या सध्याच्या कारभाराची जनताच दखल घेऊन योग्यवेळी मत व्यक्त करेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
पालिकेत जर असे होत असेल तर हे भयंकर असून अशामुळे ठेकेदार कामे करणार नाहीत , असेही त्यांनी नमूद केले .शहरातील एखादे काम निकृष्ट झाले म्हणून तक्रार करायची आणि चार दिवसांनी त्याच ठेकेदाराचे बिल द्या म्हणून प्रशासनाला पत्र द्यायचे . मग चार दिवसांत काम उत्कृष्ट झाले का ? हे कसले धंदे पालिकेत सुरू आहेत . अशा पद्धतीने ठेकेदारांची कोंडी करणार असाल तर आम्ही ठेकेदारांच्या बाजुने ठाम उभे राहू . काम चुकीचे आणि निकृष्ट झाले असेल तर जरूर तक्रार करा . त्याची चौकशी करा . पण असली नाटके करू नका . शहरातील जनता सूज्ञ आहे . योग्यवेळी तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही . इंदिरा गांधी भूमिका घेतली तर जबाबदार कोण , असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला . ज्या ठिकाणी चूक दिसेल त्या ठिकाणी मी बोलणारच , मला कोणीही अडवू शकत नाही . यापुढे कोणत्याही आरोपाचा मी खुलासा करणार नाही , असे श्री . कदम यांनी स्पष्ट केले .

