कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾प्रेयसीला घेऊन जीवाचे गोवा करण्यासाठी गेलेला विवाहित नवरोबा व प्रेयसीला पत्नीने भर हॉटेलमध्ये श्रीमुखात भडकवल्याची घटना..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

 🎴बांदा,दि-०१:- प्रेयसीला घेऊन जीवाचे गोवा करण्यासाठी गेलेला विवाहित नवरोबा व प्रेयसीला पत्नीने भर हॉटेलमध्ये श्रीमुखात भडकवल्याची घटना आज दुपारी येथे घडली. पती, पत्नी व प्रेयसी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचे समजते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विवाहित पती आपल्या प्रेयसीला घेऊन गोव्यात फिरण्यासाठी गेला होता. याची कुणकुण पत्नीला लागली होती. तिने या दोघांवर पाळत ठेवली होती. आज दुपारी गोव्यातून परतताना बांदा शहरानजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये पती आपल्या प्रेयसिसह जेवण करण्यासाठी थांबला होता. त्याचवेळी पत्नी समोर येताच दोघांनाही धक्काच बसला. यावेळी पती-पत्नीत बाचाबाची झाली.

यावेळी रागाच्या भरात पत्नीने पती व प्रेयसीच्या श्रीमुखात लगावली. त्यावेळी तात्काळ पतीने प्रेयसीला घेत मोटारीतून पलायन केले. हॉटेलमध्ये असलेल्या लोकांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. या प्रकाराची चर्चा मात्र सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!