आणखीकोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. ०१ गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या विठ्ठल लहानु बोरकर (रा. धुळे) व राजू सुरसिंग सोळूंखी (रा. मध्य प्रदेश) या दोन्ही आरोपींना न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याकामी आरोपी तर्फे अँड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा तपासणी नाक्यावर २४ मार्च रोजी सकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी पोलिसांनी कारवाई करत ५ लाख रुपयांच्या ट्रक सह ६५ लाख पेक्षा जास्त किमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली होती.

आज त्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. परंतु, अँड. परशुराम चव्हाण यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायलयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!