◾साटेली-भेडशी केंद्र शाळेच्या शौचालयाच्या दुरूस्ती कामाची सखोल चौकशी व्हावी..
◾शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत धर्णे यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदना द्वारे चौकशीची मागणी..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-३१ :- साटेली-भेडशी केंद्र शाळेच्या शौचालयाच्या दुरूस्ती कामासाठी १४ वा वित्त आयोग अंतर्गत प्रस्तावित होते. २,२६,७२४ रूपये येवढी रक्कम या कामासाठी मंजूर करण्यात आली होती.
या कामाच्या अंदाज पत्रकात म्हटल्याप्रमाणे तेथे तसे कोणत्याही प्रकारचे व्यवस्थीत रित्या काम झालेले नाही. सर्व शौचालयाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. तसेच या कामाचे ठेकेदार म्हणून स्वप्नील रामा धर्णे यांचे नाव असून ते स्वतः या कामा दरम्यान प्रत्यक्षात तेथे हजर नव्हते तर ठेकेदार म्हणून तेथे प्रकाश कदम यांनी तेथे सर्व बोगस काम केले.
या झालेल्या बोगस कामाची सखोल चौकशी व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यशवंत धर्णे यांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत लेखी निवेदना द्वारे या बोगस कामाची सखोल चौकशीची मागणी केली.

