कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, दोडामार्ग यांच्या वतीने करण्यात आली हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी..

 

◾किल्ले श्री.हनुमंत गडावरून शिवज्योत आणून सरगवे येथील शिवस्मारक येथे शिवज्योत, शिवप्रतिमेस पुष्पहार घालून व ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून केली शिवजयंती साजरी..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि-३१ :- दरवर्षी प्रमाणे हिंदू तिथीनुसार श्री.शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, दोडामार्ग यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले श्री.हनुमंत गडावरून शिवज्योत सरगवे येथील शिवस्मारका पर्यंत आणण्यात आली.

किल्ले श्री.हनुमंत गडावरून शिवज्योत झोळंबे गावात आल्यावर झोळंबे गावातील ग्रामस्थांनी शिवज्योत पूजन केले व त्या नंतर सरगवे येथील शिवस्मारक येथे शिवज्योत, शिवप्रतिमेस पुष्पहार घालून व ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र म्हणून शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी प्रशासनाने कोरोना विषाणू वरील घातलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करून सरगवे येथील शिवस्मारक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून हिंदू तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून अनेक शिवभक्त या शिवजयंती कर्यक्रमात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!