◾पोफळी ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या उर्वरीत निधीसाठी प्रयत्न करणार ; आमदार शेखर निकम
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि२९:- तालुक्यातील पोफळी ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकपर्ण सोहळा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार शेखर निकम यांनी जेष्ठ नेते दादा साळवी व पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांच्या कामाचे कोतूक केले पोफळी ग्रामपंचायत नुत्तन इमारतीसाठी मंत्री हसन मुश्रीफ याच्या माध्यमातून उर्वरित निधी मिळवून देण्याची ग्वाही आ निकम यांनी दिली .उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार,खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून पूर्व विभागातील विकास कामासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असून प स सदस्य बाबू साळवीच्या कामाचे कोतुक केले
यावेळी माजी आमदार रमेश कदम,जेष्ठ नेते दादा साळवी,तालुकाध्यक्ष जयंत खताते,उपसभापती पांडुरंग माळी, प स सदस्य अबु ठसाले,खेर्डी माजी सरपंच दशरथ दाभोळकर, सती चिंचघरी उपसरपंच राकेश चाळके,महिला तालुकाध्यक्ष जागृती शिंदे,माजी सभापती सूर्यकांत खेतले, माजी प स सदस्य रमेश राणे,चिवेली सरपंच योगेश शिर्के,मुढे सरपंच मयूर खेतले,कोडफनसवणे सरपंच सौ वैशाली जीनगरे,पोफळी महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता अजय बामणे,पोफळी सरपंच तेजस्विनी मानकर,उपसरपंच अब्दुला सय्यद,उस्मान सय्यद,जयंत शिंदे ,अली सय्यद,पोफळी ग्रामपंचायत सदस्य इब्राहिम सय्यद, पवारवाडी किसन पवार,कुंभार्ली माजी सरपंच निलेश कोलगे,छोठू कोलगे,अलोरे माजी सरपंच भाऊ मोहिते,मुफिल सय्यद,इकबाल मुल्ला, कोडफनसवणे उपसरपंच सुरेश शिगवण , ग्रामविकास अधिकारी अनिल शिंदे ,प स शाखा अभियंता कादवडकर ,विविध गावांतील सरपंच ,राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी पोफळी ग्रामपंचायतवतीने मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला प्रस्ताविक प स सदस्य बाबू साळवी यांनी केले तर सूत्रसंचालन संजय बामणे यांनी केले यावेळी पोफळी ग्रामपंचायत इमारतीला जागा देणाऱ्या अली सय्यद यांचा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पोफळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
सय्यद वाडी नदीपात्रातील सर्वाधिक गाळ काढण्यासाठी प स सदस्य बाबु साळवी यांनी प्रयत्न केले त्याला रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी त्याला सहकार्य केले त्यामुळे कोण काय बोलत असेल त्याकडे लक्ष न देता जास्तीत जास्त विकास कामे कसे होतील याकडे लक्ष देऊ या असा संदेश पदाधिकारी व कार्यकर्ते याना दिला तसेच चिपळूण मुराद पूर पुलाला उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी १४ कोटी दिली जिल्हाधिकारी तालुक्यातील ९ ते १० नद्यांचा गाळ काढण्याचा प्रस्ताव पाठविला आहे तोही लवकरच मार्गी लागेल तसेच शिमगा असला तरी सर्वांनी कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन आमदार शेखर निकम यांनी केले . आभार किशोर मानकर यांनी केले.

