कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾निगुडे गावात होळी उभारून सात दिवसाच्या शिगमोत्सवला प्रारंभ..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी : शैलेश गवस

 🎴बांदा,दि-२९:-  कोरोना चे नियम पाळत साधेपणाने परंपरा जपत केली सुरुवात. निगुडे गावातील श्री देवी माऊली मंदिर या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ गावातील मानकरी काही ग्रामस्थ यांच्या उपस्थित निगुडे गावची पहिली होळी उभारून निगुडे गावच्या सात दिवसाच्या शिगमोउत्सवाची साधेपणाने सुरुवात झाली. असंख्य वर्षाची ही अनोखी परंपरा निगुडे गाव एकोप्याने जपत आले आहे. संध्याकाळी गावातील गावडे मानकरी सवाद्य वाजत गाजत गावात होळी साठी लागणाऱ्या झाडाची विधीवत पूजा करून होळी श्री देवी माऊली मंदिराकडे आणली जाते. होळीला सजवून ती उभारल्यानंतर रांगोळी काढून तिची विधिवत पूजा करण्यात येते. त्यानंतर सामूहिक गाराहाणे घालण्यात आले. कोरोनाच्या या महामारीत सर्वांचे रक्षण कर, सर्वांना दीर्घायुष्य दे व कोरोना या देशातून व राज्यातून हद्दपार कर असे होळीचा चरणी गाराणे घालण्यात आले. आज पासून सात दिवसात शिगमो उत्सवाची निगुडे गावात सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!