आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

ग्रामदैवत श्री. जुना कालभैरव देवस्थान शिमगा महोत्सव श्रींचे पालखीचा दर्शन सोहळा नियोजित कार्यक्रम

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण : दि. २७ शहराचे जागृत श्रध्दास्थान श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट चिपळूण विद्यमाने चालू वर्षी शिमगा महोत्सव कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सूचित केलेल्या नियमांस अधीन राहून अत्यंत साधेपणाने *फाल्गुन पौर्णिमा रविवार दि.२८ मार्च ते फाल्गुन कृष्ण सप्तमी शनीवार दि. ३ एप्रिल रोजी पर्यंतच्या कालावधीत नित्य नियमित श्रींच्या पालख्या भक्तगण नागरिकांना दर्शनासाठी श्री जुना कालभैरव मंदिर प्रांगणात सकाळी ८ ते रात्रौ ८ पर्यंत बैठ्या ठेऊन साजरा करण्यात येत आहे.

श्रींचे चतुःसिमा प्रभागवार पालखी दर्शनाचा सोहळा नियोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे –

रविवार दि. २८ मार्च :- रोजी रात्रौ होळी पूजा व होम प्रज्वलन पारंपरिक धार्मिक विधी फक्त पाच मानकरी सेवेकरी यांच्या उपस्थितीत होईल. प्रशासकिय आदेशा अन्वये रात्री संचारबंदी जमावबंदी असल्याने या कार्यक्रम प्रसंगी भक्तगण नागरिकांनी उपस्थित राहू नये. ( स्थळ : श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिर पटांगण)

सोमवार दि. २९ मार्च : – श्रींची सहाण भरणे, श्री देवी भवानी भेट सीमा व धुळवट :- पहाटे चतुःसीमा धूळवट होईल, सकाळी ‘श्रीं’ ची सहाण भरणे धार्मिक विधीनंतर वैश्यवसाहत, अण्णाभाऊ साठे नगर, मुरादपूर, साळीवाडा,कदमवाडी, कुंभारवाडी, खालची भोईवाडी, वरची भोईवाडी, शंकरवाडी, नवीन वसाहत, रामतीर्थ परिसर, नवीन मारवाडी वसाहत, श्री वेस मारूती परिसर, घाणेकर हॉस्पिटल परिसर, मेहता पेट्रोल पंप परिसर, संभाजी चौक – साई मंदिर परिसर , स्वामी मठ परिसर, मार्कंडेय वसाहत (मार्कन्डि ) येथील भक्तगण नागरिकांनी श्रींच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा.

मंगळवार दि. ३० मार्च :- श्री देवी विंध्यवासिनी भेट सिमा व शेणवट- सकाळी चतुःसीमा शेणवट कार्यक्रम होईल. आज देवधर हॉस्पिटल परिसर , पंचमुखी हनुमान मंदिर परिसर, परशुराम नगर , कावीळ तळी, बांदल हायस्कूल परिसर, परांजपे स्कीम परिसर, परांजपे हॉटेल परिसर , जिव्हाळा बाजार परिसर, राहुल गार्डन परिसर,भागडेवाडी, गांधी नगर वडार कॉलनी , कुंभारवाडा बहादूरशेख नाका परिसर,श्री दत्त मंदिर खेर्डी परिसर, राधाकृष्ण नगर आतील नवीन वसाहत, रावतळे मराठी शाळा परिसर ,विंध्यवासीनी मंदिर रोड ,अण्णा मेहता पेट्रोल पंप परिसर हिंदू कॉलनी, रावतळे मराठी शाळा परिसर, गणेशवाडी, पहिली व दुसरी ओझरवाडी ,शिवाजीनगर ,कराड रोड व मुंबई गोवा हायवे मधील परिसर या प्रभागातील भक्तगण नागरिकांनी श्रींच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा.

बुधवार दि. ३१ मार्च :- खिंड, उक्ताड व बाजार चव्हाटा सीमा खाटिक गल्ली, श्रींचा चव्हाटा परिसर, भार्गव पेठ, प्रभातगल्ली, बंदरपूल परिसर, नाथपै चौक, भेंडीनाका परिसर, मापारी मोहल्ला, जिनगर आळी, खेंड-चौकी ईच्छा -पूर्ती गणेश मंदिर परिसर, महापुस्कर मारुती मंदिर , कानसेवाडी, उक्ताड श्री कालभैरव मंदिर परिसर , उक्ताड गणेश मंदिर परिसर , खेंड-पांचमाडकर विठ्ठल मंदिर परिसर, संसारे नाका परिसर, हेलेकर मारूती परिसर, पिंपळ गणेश मंदिर परिसर , वासुरकर शंकर मंदिर परिसर, चितळेवाडा, दुर्गाळी, जुना एस. टी. स्टँड परिसर, परकार कॉम्प्लेक्स परिसर, छत्रे मारूती परिसर, बाजारपेठ, गांधी चौक , खरेदी-विक्री संघ तांबोळी आळी, गुरव आळी परिसर, ऐकवीरा मंदिर परिसर, वडनाका , सोनार आळी आदी प्रभागातील भक्तगण नागरिकांनी श्रींच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा.

गुरुवार दि .१ एप्रिल : – पाग- खिंड सीमा ( महालक्ष्मी भेट सीमा) वडनाका ते शिवाजी चौक-चिंचनाका परिसर , भोगाळे परिसर, मध्यवर्ती एस.टी.स्टँड परिसर, बुरूमतळी , मोडक चाळ, पोलीस लाईन, पॉवर हाऊस कॉलनी, दै. सागर मुख्य कार्यालय परिसर , गोरीवले वाडी, उघडा मारूती परिसर ,विश्वकर्मा चौक परिसर, रानडे आळी गोपाळकृष्ण मंदिर,जोशी आळी श्री कृष्णेश्वर मंदिर परिसर, भगवा चौक ते चितळे बंधू भागिर्थी निवास पर्यत चा परिसर, ताम्हाणे असोसिएटच्या कृष्णेश्वर नगर , देसाई बाजार परिसर, पाग मळा , सावंत घर समूह्, कोल्हेखाजण, श्री महालक्ष्मी नगर ते जाखमाता मंदिर ते खिंडीत पिंपळ गणेश मंदिरापर्यंत परिसर,स्वर विहार गुहसंकुल बोडणी परिसर, आंबेडकर हॉल परिसर, नारायण नगर आदी प्रभागातील भक्तगण नागरिकांनी श्रींच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा.

शुक्रवार दि. २ एप्रिल:- श्री कालभैरव लळित, रंगपंचमी, चव्हाटा कार्यक्रम महाराष्ट्र हायस्कूल रोड, तळ्यातील गणपती मंदिर परिसर, अमेय पार्क परिसर, व चिपळूण शहरातील उर्वरित प्रभागातील भक्तगण नागरिकांनी श्रींच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा. सायंकाळी चतुःसीमा रंगपंचमी, कालभैरव लळित कार्यक्रम, रात्रौ चव्हाट्यावर व्यावसायीक रयतेसाठी मांड भरणे औपचारिक धार्मिक कार्यक्रम ५ मानकरी सेवेकरी यांच्या उपस्थितीत होईल. शासन निर्बंधा नुसार या कार्यक्रमात भक्तगण नागरिकांनी उपस्थित राहू नये.

शनिवार दि. ३ एप्रिल :- पाग झरी व पवार आळी सीमा व केदार लळित श्री देव केदार मंदिर (वैश्य वसाहत )प्रांगणात श्रींच्या सहाणे वर ब्राह्मण आळी , बेंदरकर आळी , राऊतआळी गणेश मंदिर परिसर, श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, श्री जुना कालभैरव मंदिर होळी परिसर, बापटआळी, जंगम आळी, कन्याशाळा,गौतमेश्वर नगर परिसर, आईस फॅक्टरी परिसर ,देवधर नगर परिसर , बुरूमतळी, सिव्हिल कोर्ट परिसर, झरी- लटके वाडी परिसर ,तहसीलदार कार्यालय परिसर, वीरेश्वर कॉलनी, वीरेश्वर मंदिर परिसर, बौध्द वाडी परिसर, प्रांत कार्यालय परिसर, प्रभात रोड – नारायण तलाव परिसर, रॉयल नगर , कदम चाळ, जुनी वडार कॉलनी, भेंडे गल्ली, श्रीराम मंदिर ,केदार मंदिर परिसर आदी प्रभागातील भक्तगण नागरिकांनी श्रींच्या पालखी दर्शनाचा लाभ घ्यावा.केदार लळित कार्यक्रमाने शिमगा उत्सव समाप्ती होईल.

विशेष सूचना : 👇👇
कौरौना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार शिमगा उत्सवातील पारंपारिक रितीरिवाजा नुसार फक्त धार्मिक विधि होणार आहेत. उत्सव काळात मंदिर परिसरात कुठेही दुकान , इतर स्टॉल ला परवानगी नाही . कोरोना पार्श्वभूमीवर सर्वानि जबाबदारी म्हणून सोशल डिस्टन्स , मास्क व इतर खबरदारी घेणे आवश्यक आहे ,अन्यथा आपत्तिव्यवस्थापन कायदा अंतर्गत कड़क दंडात्मक कार्यवाही प्रशासना मार्फत केलि जाईल.

शिमगा उत्सव कालावधीत शासन नियमांचे भक्तगण नागरिकांनी पालन करून श्रींच्या पालखी दर्शन सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री. ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापकीय विश्वस्त किशोर शेट्ये , समीर शेट्ये , महाजन विश्वस्त पंकज कोळवणकर, सेवेकरी विश्वस्त सुमंता शिंदे आणि चंद्रशेखर लाड शिमगा उत्सव समिती अध्यक्ष कुन्दन खातू यांनी प्रसिध्दी साठी दिलेल्या पत्रकाअन्वये करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!