आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

जि. प. सभापती पद देण्याचा शब्द देऊनही ऐनवेळी डावलले

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २७ मला जि. प. सभापती पद देण्याचा शब्द देऊनही ऐनवेळी डावलल्यामुळे, मी जि. प. सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची भावना कासार्डे मतदारसंघाचे जि. प. सदस्य संजय देसाई यांनी बोलून दाखवली.

राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी याना सभापतीपद देत मला शब्द देऊनही ऐनवेळी डावलण्यात आले. कैक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून इमानेइतबारे काम केले. मागील 4 वर्षांत कुठलीही अपेक्षा केली नाही. मात्र 26 मार्च रोजी झालेल्या जि.प.विषयसमिती सभापती निवडीवेळी मला सभापती पदाचा शब्द पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला होता. शेवटच्या घटकेला मला का डावलण्यात आले ? आम्ही एकनिष्ठ राहिलो आणि राष्ट्रवादी च्या जि.प.सदस्याला सभापतीपदी बसवले. राष्ट्रवादी च्या सदस्यावर विश्वास आणि आमच्यावर पक्षश्रेष्ठींचा विश्वास नाही काय ? असा सवाल करत जि.प.अध्यक्षांकडे मी माझा सदस्यपदाचा राजीनामा सादर केला आहे. यापूढे तूर्तास तरी पक्षाचे काम थांबवत असल्याचेही संजय देसाई म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!