वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना बायका पुरवून आपली अवैध कामे करून घेतात – परशुराम उपरकर
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २७ वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना बायका पुरवून आपली अवैध कामे सिलिका माफिया करून घेत असल्याचा खळबळजनक आरोप मनसे सरचिटणीस उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच अवैध सिलिका वाळू उत्खननांमध्ये माफिया यांनी आपल्यावर कारवाई होऊ नये. यासाठी महसूल अधिकाऱ्यांना गोवा, पाली या ठिकाणी जात आहे. त्यामुळे अधिकारी सिलिका माफियांना सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचेही उपरकर म्हणाले.
मागील रविवारी कासार्डेतील बेकायदा उत्खनन करणारे सिलिका माफिया आणि जिल्ह्याचा वरिष्ठ महसूल अधिकारी पाली येथे सेटलमेंटसाठी गेल्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील 4 वरिष्ठ अधिकारी कधी सावंतवाडीत, कधी कुडाळ मध्ये हॉटेलात बसून मायनींग बाबतची व्यूहरचना करतात. जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत निलंबित झालेले नायब तहसीलदार राठोड हेच सिलिका खाणींची पाहणी पथकाचे प्रमुख आहेत. नायब तहसीलदार राठोड यांच्या आशीर्वादानेच सध्या कासार्डेत अवैध सिलिका उत्खनन सुरू आहे. अवैध सिलिका खाणींची मोजमापे घेताना काहींना नायब तहासिलदार राठोड यांनी सॉफ्ट कॉर्नर दिल्याचा आरोप उपरकर यांनी केला. राठोड यांनी केलेल्या अवैध सिलिका खाणींच्या चौकशीची फेरचौकशी करण्याची मागणी उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

