कोकणच्या कर्तृत्ववान सुपुत्राचा गौरव; ‘प्रोजेक्ट संजीवनी’मधून ग्रामीण आरोग्यसेवेला नवी दिशा!
🛑 सुरेश प्रभू देशाची अमूल्य संपत्ती; गावागावात आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा पोहोचविणारा सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद – आ. निलेश राणे
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कुडाळ, दि-१६ :- कोकणभूमीचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे देशासाठी अमूल्य संपत्ती असून, देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आणि दिलेले योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, ही प्रत्येक कोकणवासीयासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी काढले.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणीसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, तसेच आवश्यक आरोग्यसेवा त्यांच्या गावातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ अणाव येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्था अध्यक्षा सौ. उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्यासह डॉक्टर, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी अनेकदा शहरांकडे जावे लागते. ही गरज ओळखून आरोग्य तपासणीची सुविधा थेट गावपातळीवर उपलब्ध करून देणारा ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि समाजोपयोगी आहे, असे आ. निलेश राणे यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वेळेवर आरोग्यविषयक समस्या लक्षात येण्यास तसेच आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून सुरू झालेली ही आरोग्यसेवा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी निश्चितच आशादायी ठरेल, असे सांगत आमदार निलेश राणे यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

