चिपळूनात कृषी व कामगार विधेयकाविरोधात काँग्रेसचे उपोषण
◼️उपोषणाच्या यशस्वी नियोजनाबद्दल तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व सहकाऱ्यांचे प्रभारी मनोज शिंदे यांनी केले कौतुक
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴 चिपळूण : दि. २६ केंद्र सरकारने पारित केलेले जाचक कृषी व कामगारविरोधी कायद्याविरोधात येथील काँग्रेसने चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण छेडण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठवली. तर या उपोषणाच्या नियोजनाबद्दल चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह सहकाऱ्यांचे कौतूक केले.
शेतकºयांकडून राजधानी दिल्लीत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला बराच काळ होऊन गेला तरी केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. यामुळे केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात उपोषण छेडले जात आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चिपळूण कॉँग्रेसच्यावतीने तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी युवक कॉँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम यांच्या महामार्गालगत शिवसागर हॉटेल शेजारील कार्यालय परिसरात उपोषण छेडण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मनोज शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही एक प्रकारे हुकमशाही आहे. या हुकूमशाहीचा लवकरच अस्त होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त केला. काँग्रेस पक्ष गांधी, नेहरूंच्या विचारांवर आजही वाटचाल सुरू असून कॉंग्रेसच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते याची जाणीव देशातील जनतेला होऊ लागली आहे. तर या उपोषणाच्या प्रशांत यादव सहकाऱ्यांचे कौतुक केले.
या वेळी माजी नगरसेवक रतन पवार, सुरेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, नगरसेवक करामत मिठागरी, नेते इब्राहीम दलवाई, तालुका उपाध्यक्ष मनोज शिंदे, माजी नगरसेविका गौरी रेळेकर, अशोक डाकवे, वासुदेव मेस्त्री, संजय साळवी, नंदकुमार कामत, अक्रम खान, रुपेश शिगवण, संजय शिगवण, गणेश शिगवण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम,उपाध्यक्ष् रुपेश आवले, चिपळूण शहाराध्यक्ष फैसल पिलपिले, रेशमा पवार जयश्री खांबे, वनिता पवार,अबुल बेबल, रहुल भेलेकर, करीम भेलेकर, इक्बाल बेबल, सलमान चौगुले, ऋषिकेश शिंदे, शकील शेख, महेंद्र डीगे आदी उपोषणाला उपस्थित होते.

