कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾बांद्यात दुचाकीने दिली राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या उभ्या गाडीचा धडक..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी:शैलेश गवस

🎴बांदा, दि-२५:- गोव्या वरून बांद्याच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीने कट्टा कॉर्नर येथील ओवेस कॉम्प्लेक्स येथे उभ्या असलेल्या चारचकीला धडक दिल्याने अपघात घडला. सदर चारचाकी ही रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांची होती. धडक दिलेला दुचाकीस्वार यामध्ये किरकोळ जखमी झाला मात्र चारचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर अपघात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला.

जखमी झालेल्या युवकावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडण्यात आले. सदर अपघाताची नोंद बांदा पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!