आरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾अपरांत हॉस्पिटल च्या रुग्णसेवेचा सावर्डे येथे शुभारंभ..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि-२५ :- “काळजी तुमच्या आरोग्याची,हमी आमच्या सेवेची”असे ब्रीदवाक्य घेऊन अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या व समस्त चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरातील आरोग्य वाहिनी म्हणून जनमानसात ओळख असणाऱ्या अपरांत हॉस्पिटल ने गुरुवार दिनांक २५ मार्च पासून आपली रुग्णसेवा आता सावर्डे येथे सुरू केली आहे. अपरांत हॉस्पिटलचे पूर्णवेळ ऑर्थोपेडिक सर्जन डॉ तन्मय दाते यांची ओ.पी.डी डॉ अरुण पाटील यांच्या क्लिनिक मधे असणारं आहे तसेच अपरांत चे पूर्णवेळ बालरोग तज्ञ डॉ दिगंबर तेंडुलकर यांची ओ.पी.डी डॉ कृष्णकांत पाटील यांच्या येथे असणारं आहे. अपरांत हॉस्पिटल ने सुरू केलेल्या या सुविधेचा लाभ सावर्डे व आजूबाजूच्या अनेक रुग्णांना प्रत्येक गुरुवारी घेता येणार असून याचा अनेक रुग्णांना फायदा होईल असे मत या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या प्रमुख उद्घाटक पंचायत समिती सदस्य सौ. पूजाताई शेखर निकम यांनी व्यक्त केले.सदर उपक्रमास त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या व अश्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून अपरान्त हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक देखील केले.डॉ कृष्णकांत पाटील त्यांच्या पत्नी डॉ सौ दर्शना पाटील,डॉ अरुण पाटील व या दोन्ही हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्ग यांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!