संपूर्ण कणकवली तालुक्याने आदर्श घ्यावा, अशी एकमेव जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 खारेपाटण : दि. २५ “संपूर्ण कणकवली तालुक्याने आदर्श घ्यावा, अशी एकमेव जि. प. केंद्र शाळा खारेपाटण नं. १ ही उपक्रमशील शाळा असुन जिल्ह्यतील इतर शाळांनीही याचा आदर्श घ्यावा.” असे भावपूर्ण उदगार कणकवली तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती मनोज रावराणे यांनी आज खारेपाटण केंद्र शाळेला दिलेल्या सदिच्छा भेटी दरम्यान काढले.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. १ या शाळेची नुकतीच राज्यस्तरीय आदर्श शाळा म्हणून निवड झाली असल्याने, या शाळेतील शिक्षकांचे व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सभापती मनोज रावराणे आज खारेपाटण केंद्र शाळेत आले होते. यावेळी त्यांच्या समवेत उपसभापती प्रकाश पारकर, पंचायत समिती सदस्या सौ. तृप्ती माळवदे शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल आदी उवस्थित होते.
यावेळी सभापती मनोज रावराणे यांचे शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती आद्यक्षा सौ. गौरी शिंदे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तर उपसभापती प्रकाश पारकर यांचे शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे यांचे स्वागत मातापालक संघाच्या उपाध्यक्षा समीक्षा शेट्ये यांनी केले. यावेळी पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ऋषीकेश जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सद्स्य मनोज करंदीकर, पवन कासलीवाल शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर आदी उपस्थित होते.
कणकवली पंचायत समिती व परिक्षा समिती कणकवली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुक्यातील स्कॉलरशिप व नवोदय सराव परीक्षा केंद्राना आज सभापती मनोज रावराणे व उपसभापती प्रकाढ पारकर यांनी सयुक्तिक भेटी दिल्या. “अज्ञाना कडून ज्ञाना कडे नेणारी प्राथमिक शाळा ही आपला पाया आहे. खारेपाटण येथील शाळेने अत्याधुनिक सुविधा शाळेत निर्माण करून संस्कृतमक गुणवत्ता टिकविण्याचे काम केले आहे.” असे प्रतिपादन उपसभापती प्रकाश पारकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांचा सभापती मनोज रावराणे यांच्या शुभहस्ते आदर्श शाळा मानांकन प्राप्त झाल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यकर्माचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनीं केले. तर सर्वांचे आभार शाळेच्या पदवीधर शिक्षिका अर्चना तळगावकर यांनी मानले.