🛑 गोगटे-वाळके महाविद्यालयात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०२:- गोगटे-वाळके महाविद्यालय,बांदा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी दोन्ही महान विभूतींच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते राज्यशास्त्र विभागाचे प्रा.पी.डी.कसबे यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला.अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, “अण्णाभाऊंनी अत्यंत खडतर आणि संघर्षमय जीवन जगून मराठी साहित्यात अवीट ठसा उमटवला.३२ हून अधिक कादंबऱ्या आणि २२ हून अधिक कथासंग्रहांच्या माध्यमातून त्यांनी कामगार व कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद केला.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी रचलेली ‘माझी मैना गावाकडं राहिली’ ही छक्कड प्रचंड गाजली.वाटेगाव ते मुंबई आणि पुढे रशिया असा त्यांचा जीवनपट थक्क करणारा होता.” त्यांनी आपली प्रसिद्ध ‘फकिरा’ कादंबरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केल्याचा उल्लेखही प्रा.कसबे यांनी केला.लोकमान्य टिळकांच्या योगदानाबद्दल बोलताना प्रा.कसबे यांनी स्पष्ट केले की, “टिळक हे प्रखर राष्ट्रवादी,गणित व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि कायद्याचे पदवीधर होते.’केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. स्वराज्य,स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा पुरस्कार करत त्यांनी शिवजयंती व गणेशोत्सवाची सुरुवात केली. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी लिहिलेला ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ आणि ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम इन द वेदाज’ ही पुस्तके त्यांच्या अथांग ज्ञानाची साक्ष देतात.”या कार्यक्रमासोबतच हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांनाही अभिवादन करण्यात आले.या प्रसगी हिंदी विभागाचे प्रा.राजेंद्र पवार सर यांनी मुन्शी प्रेमचंद यांचा जीवन प्रवास उलगडून सांगितला.व त्यांची प्रसिद्ध कादंबरी ‘गोदान’ विषयी देखील सांगीतले.या संयुक्त अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रा.डी.जी.जोशी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागाचे प्रा.राजेंद्र पवार यांनी केले,तर उपस्थितांचे आभार राज्यशास्त्र विभागाचे प्रा.अभिजीत गटकुळ यांनी मानले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Posts by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

