युनिटी क्रिडा म॔डळ , पाग यांचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
◼️गिनीज बुक मध्ये नोंद होण्यासाठीचे नियोजन
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴 चिपळूण : दि. २४ शहरातील पाग येथील युनिटी क्रिडा म॔डळ यांचे वतीने २३ मार्च २०२१ रोजी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या हुतात्म्यांचा शहीद दिनी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.सदर प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री,आमदार भास्करशेठ जाधव , माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेशभाई कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, जिल्हाप्रमुख सचिन कदम, ज्येष्ठ नगरसेवक मोहन मिरगल, नगरसेविका सई चव्हाण, माजी नगरसेवक संजय तांबडे ,माजी नगरसेवक फैसल कास्कर, पाग ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद ठसाळे, सायन हॉस्पिटल मधील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी , मराठी शाळेचे मोरे सर आणि पाग ग्रामस्थ उपस्थित होते.
संवेदना फाऊंडेशनच्या वतीने युनिटी क्रीडा मंडळाने आयोजित रक्तदान शिबिरास मोलाचे सहकार्य केले.सदरचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला.अनेक वर्षांनंतर मंडळाने रक्तदान शिबीर आयोजित केले असताना तब्बल ७० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.विशेष म्हणजे पागेतील तरूण आणि महीलांनी सदर कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तसेच रक्तदान करण्यासाठी पाग येथील ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती.सदर मंडळातर्फे गिनीज बुक मध्ये या उपक्रमाची नोंद होण्याच्या दृष्टीने आयोजन करण्यात आले होते. सगळ्यांनी एकत्र येऊन चांगले काम केले आणि सर्वांनी दाखवून दिले की युनिटी म्हणजे काय असते असे गौरवोद्गार प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युनिटी क्रीडा मंडळ चे अध्यक्ष मिथिलेश (विकी)नरळकर,उपाध्यक्ष अजय तांबडे ,सचिव स्वप्निल नाचणकर , खजिनदार कौस्तुभ ठसाळे,मंडळाचे सदस्य – सुभाष आंब्रे, मंगेश शेलार , स्वप्नील मिरगल,शेखर सावंत, मनोहर चिले,सल्लागार संतोष खेडेकर, जगदीश ओक तसेच अनक्रशेबल ग्रुप चे अध्यक्ष संस्थापक मंगेश (आबा )शिंदे,पागउघडा मारुती ग्रामस्थ मंडळ चे अध्यक्ष प्रमोद ठसाळे, तसेच पाग उघडा मारुती ग्रामस्थ आणि युनिटी क्रीडा मंडळ सभासद समीर पागार,संपत देवकांत,राम पाटकर,आनंद जाधव,विनायक सावंत,शैलेश गोगडे,घनश्याम नरळकर,संजय शिंदे,शेखर शेट्टी,संजय सावंत ,भरत शिंदे,संजय नाचणकर , अमोल गोगडे , निलेश गोगडे , अंकित नरळकर ,सुयश नरळकर सुरज शिंदे हेमंत भोसले , संदेश गोरीवले , महेश शिंदे सनी गोगडे ओमकार जाधव , ऋषभ तांबडे , आशुतोष गोरीवले, संदेश किंजळकर , गौरव साळवी , सुयोग सावंत , सुहास चव्हाण व नेहमी सहकार्य करणारे पागे मधील मुस्लिम बांधव आणि त्यातही प्रेरणादायक नौशाद काद्री त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आणि मुली ने रक्तदान करून सहकार्य केले . महिला सदस्य सौ संगीता ठसाळे, सौ पाटकर, सौ संध्या बामणे, कुमारी वैष्णवी पाटकर आदींनी मेहनत घेतली.

