सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सेनेकडून कुडाळकर तर भाजपकडून पुनम ढवण यांची उमेदवारी
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴 सिंधुदुर्गनगरी : दि. २४ जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर यानी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आ. वैभव नाईक, संदेश पारकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, संजय आंग्रे, राजलक्ष्मी डिचवलकर, प्रदीप नारकर आदी उपस्थित होते.
तर सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी भाजपने माजी अध्यक्षा तथा पूनम ढवण या नावाने माहेरवाशिनी असलेल्या संजना सावंत यांची निवड केली आहे. गटनेते रणजीत देसाई, माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सरोज परब यानी जिल्हा परिषदेत दाखल होत उमेदवारी अर्ज घेतला आहे.

