आणखीकोकणराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करण्यात यावेत…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴 सावंतवाडी : दि. २४ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एलपीजी गॅस पंप तात्काळ सुरू करण्यात यावेत तसेच रिक्षाचालकांना विमा सवलत देण्यात यावी या मागणीसह विविध प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सिंधुदुर्ग रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

कोरोना काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे प्रशासनाने दिलेले नियम पाळत रिक्षा व्यवसाय बंद ठेवण्यात आला होता, त्यावेळी शासनाने रिक्षाचालकांच्या व्यवसायाचा विचार करून गेल्या सहा ते सात महिने रिक्षा पासिंग साठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत दिलेली होती मात्र रिक्षाचालकांना विम्याच्या रकमेच्या सवलत दिलेली नाही आज जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील एलपीजी गॅस पंप गेले सहा ते सात महिने बंद आहेत जिल्ह्यात बाराशे ते तेराशे रिक्षा एलपीजी वर चालणाऱ्या आहे आहेत त्यामुळे पंप बंद असल्याने अशा रिक्षाचालकांचे हाल होत आहेत त्यामुळे हे पंप तात्काळ सुरू करण्यात यावे असे मागणी यापूर्वी निवेदनाद्वारे करण्यात आली होती मात्र त्यावर अद्यापही कोणताही तोडगा निघालेला नाही तरी विम्याच्या रकमेच्या सवलत देण्याबरोबरच एलपीजी गॅस पंप सुरू करण्याबाबत विचारविनिमय व्हावा असे मागणी यावेळी करण्यात आली.

तर लॉकडाऊन कालावधीमध्ये रिक्षाचालक मालकांची परवाना रिप्लेसमेंट परवाना नूतनीकरण तसेच इतर अनेक प्रलंबित प्रकरणे ती भरुन प्रलंबित आहेत गेले वर्षभर आरटीओची बैठक झालेली नाही तरी पुन्हा एकदा रिक्षा नूतनीकरणासाठी मुदत वाढवून देण्यात यावी किंवा आरटीओ ची बैठक घेऊन सर्व प्रलंबित कामे मंजूर करण्यात यावी असे मागणीही करण्यात आले आहे.

यावेळेस जिल्हा अध्यक्ष संजय शारबिद्रे, सेक्रेटरी सुधीर पराडकर खजिनदार राजन घाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!