🛑आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी.
*🛑आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी.*
*🛑वारीतून विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा,झाडे जगवा’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश;*
*🛑ग्रामस्थांकडून चिमुकल्यांवर बक्षीसांचा वर्षाव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- २५:-* आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे आयोजित करण्यात आलेली विद्यार्थ्यांची आनंदवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली.विठ्ठल-रुक्मिणी,विविध संतांची व वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडीत सहभाग घेतला.यावेळी स्वप्नील संजय गावडे याने विठ्ठलाची तर सौम्या सागर गावडे हिने रूक्मिणीची केलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली.टाळ-मृदुंगाच्या गजरात,अभंग आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.यावेळी विद्यार्थ्यांनी केवळ भक्तीचा संदेशच नव्हे,तर “झाडे लावा,झाडे जगवा” हा पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले विठ्ठलभक्तीबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणारी ही आगळीवेगळी आनंदवारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.शाळेपासून सुरू झालेली ही आनंदवारी गावातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत असताना ग्रामस्थांनी चिमुकल्या वारकऱ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.त्यांच्या निरागस भक्तीभावाने आणि पर्यावरण जनजागृतीच्या संदेशाने भारावून गेलेल्या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत त्यांना खाऊ तसेच बक्षिस स्वरूपात रोख रक्कम देऊन प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरेची ओळख,संतांच्या विचारांचे संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.अध्यात्म,संस्कार,सामाजिक बांधिलकी आणि निसर्गप्रेम यांचा सुंदर संगम या आनंदवारीत अनुभवायला मिळाला.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक श्री.जे.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर,उपाध्यक्षा यशोदा गावडे,ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे,शिक्षणप्रेमी विजय गावकर,पोलिस पाटील समृद्धी गावडे,अंगणवाडी सेविका संजना गावकर,मदतनीस अमृता कविटकर व संचिता सावंत यांच्यासह पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आनंदवारीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.ग्रामस्थांच्या या प्रेमळ प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.भक्ती,संस्कार आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी ही आनंदवारी घारपी गावासाठी संस्मरणीय ठरली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

