◾ सरकार अस्थिर करणे हा भारतीय जनता पक्षाचा कटाचा भाग ; बबन साळगावकर
◾ सरकारने गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारू नये..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२२:- सत्तेशिवाय जगू शकत नाही अशी अवस्था विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची झालेली आहे पाणी बिना मछली जशी तडफडते तसे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तडफडत आहेत, सतत खोटे आरोप करणे, आणि रेटुन बोलणे अशा पद्धतीचं आरोप गेल्या पंधरा महिन्यांमध्ये सत्तेवरून उतरल्यानंतर देवेंद्र फडणीस करत आहेत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नागपूरचे आहेत नागपूर देवेंद्र फडणीस यांपासून जनता दुर होत चालली आहे सतत मंत्र्यांवर ती खोटे आरोप करून सरकार अस्थिर करण्याचा कट भारतीय जनता पक्षाने रचला आहे त्यामुळे देशमुख यांचा राजीनामा सरकार ने स्विकारु नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.
एखाद्या मंत्र्या वरती आरोप केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात क्षणात आंदोलने केली जातात, याला काय म्हणावं संपूर्ण मीडिया वरती सोशल मीडिया वरती तसेच प्रिंट मीडिया समोर येऊन पद्धतशीरपणे आरोपाचा रान उठले जात आहे याला महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आघाडीची शिल्पकार आदरणीय शरच्चंद्र पवार साहेब यांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या मागणीला धुडकावून लावली,भारतीय जनता पक्षाचे नेते आता देशाचे गृहमंत्री गुजरातचे गृहमंत्री असताना राज्याच्या पोलिस महासंचालकांनी अमित शहा वरती अशाच स्वरूपाचे आरोप केले होते त्यावेळी तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला होता का असा सवाल साळगावकर यांनी केला आहे.

