◾ अखेर मुळस ते विजघर रस्त्याला सुरुवात..
◾ युवासेना समन्वयक मदन राणे व तेरवण-मेढे माजी सरपंच प्रविण गवस यांच्या आक्रमक भूमिकेला यश..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२० :- मुळस ते विजघर हा रस्ता मंजूर होऊन कित्येक महिने झालेत परंतु हा रस्ता करण्यासाठी ठेकेदार दिरंगाई करत होता. हा रस्ता सुरळीत व्हावा यासाठी युवासेना समन्वयक मदन राणे व तेरवण-मेढे माजी सरपंच प्रविण गवस व ग्रामस्थांनी बांधकाम विभागाला घेरावा घातला होता. त्यानंतर आपण हे काम दुसऱ्या दिवशी पासून सुरू करतो असे संबंधित ठेकेदाराकडून सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे हे काम दुसऱ्या दिवशी पासून सुरू झालेे, त्यामुळे ग्रामस्थ व वाहनधारकां मधुन समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी युवासेना समन्वयक मदन राणे व तेरवण-मेढे माजी सरपंच प्रविण गवस, जिल्हा संघटक प्रविण गवस, संदेश राणे, ऑल्विन लोबो, दत्ताराम तळणकर, दशरथ मोरजकर, प्रकाश नाईक आदी उपस्थित होते.

