कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ कै.दिनकर गंगाराम सामंत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नगरसेवक डॉ जयेंद्र परुळेकर यांनी गरजूंना धनादेशाचे वाटप…

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२०:- मुंबई येथील कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना आर्थिक मदतीचा धनादेश देऊन सहकार्य करण्यात आले.‌ जिल्ह्यातील २१ हून अधिक गरजवंताना ट्रस्टच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला.‌ नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.‌

गरजवंताना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. पत्रकार बांधवांच्या हस्ते या मदतीच वाटप करण्यात आले. यात रामचंद्र गावकर, इंदुमती फारस, दिपक पवार, दर्शना मेस्त्री, किशोरी जाधव, सगुण जाधव, चंद्रलिला रेडकर, धनश्री झोरे, गिता जाधव, गुणवंती जाधव, पांडुरंग जाधव, शशिकांत जाधव, अनुसया जाधव, जयश्री परब, सान्वी बांदेकर, अनुराधा बांदेकर, शारदा जाधव, सिंधु जाधव, रेश्मा जाधव, प्रणाली गावडे, रूपाली जाधव यांना हे धनादेश प्रदान करण्यात आले‌.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे,सिताराम गावडे, हरिश्चंद्र पवार, राजेश नाईक, अँड. संतोष सावंत, अमोल टेमकर, अनंत जाधव, विनायक गावस, गणेशप्रसाद गोगटे आदिंच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. परुळेकर म्हणाले, दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मधून गरजूंना आर्थिक मदत केली जाते ही वैद्यकीय, शिक्षण व अन्य कारणासाठी केली जाते. कोरनाच्या काळामध्ये आर्थिक मदत करताना काही अडचणी आल्यात मात्र दरम्यानच्या काळात ४२ गरजूनी अर्ज केले होते त्यातील २१ जणांना आज धनादेश वाटप करण्यात येत आहेत. अन्य गरजूंना लवकरच धनादेश वाटप करण्यात येणार आहेत असे डॉ. परूळेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!