आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

चिपळूण शहरातील राधाकृष्ण नगरमधील नागरिकांना २० मार्चला ती रखडलेली कामे सुरू करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. १९ शहरातील राधाकृष्ण नगर मधील खोळंबलेल्या रस्ता आणि गटार कामाच्या मुदत वाढ ठरावावर मी सही करते, आपण शनिवारी त्याचे पुन्हा काम सुरू करू. असे आश्वासन नगराध्यक्ष सौ . सुरेखा खेराडे यांनी राधाकृष्ण नगर मधील शिष्ट मंडळाला दिले. हे शिष्ट मंडळ आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांच्या नेतृत्व खाली आज शुक्रवारी खेराडेंना भेटले.

फेब्रुवारी मधील सर्व साधरण सभेत चिपळूण शहरातील ३७ विकास कामांना मुदत वाढ देण्यात आली. परंतू या ३७ कामांच्या मुदत वाढ ठरावावर खेराडे यांनी सही करण्यास विलंब केला. महाविकास आघाडी तर्फे त्यांना याबाबत विचारले असता त्यानी समर्पक उत्तर दिले नाही.असा महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन आरोप केला होता.

म्हणून आज राधाकृष्ण नगर मधील नागरिक सकाळी ११.३० ला नगर परिषद मध्ये धडकले. यावेळी आरोग्य सभापती शशिकांत मोदी यांनी मुदत वाढ ठरावावर सही केव्हा करणार असे खेराडेंना विचारताच त्यांनी शनिवारी काम सुरू होणार असे स्पष्ट सांगितले.यावेळी राधाकृष्णनगर बाबत सविस्तर चर्चा झाली.

सुनील चव्हाण, विनय चितळे, विलास खोत, रमेश आवले, गजानन पडावे , संजय घोलेकार,बाबूशेठ चव्हाण, वामन उतेकर यांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी नगरसेवक आशिष खातू, नगरसेविका वर्षा जागुष्टे उपस्थित होते.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
      अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!